स्वच्छता महायज्ञ

वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यमगरवाडी (ता. तुळजापूर) आणि रामतीर्थला वेळोवेळी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात, त्यामधील एक उपक्रम म्हणजे ‘स्वच्छतेचा महायज्ञ’ होय. रामतीर्थ हे नळदुर्ग परिसरातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे. याठिकाणी श्रीराम आलेले होते, असे म्हटले जाते. त्यामुळे वात्सल्य सामाजिक संस्थेकडून या परिसराची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली होती.

रामतीर्थ परिसराची स्वच्छता करत असताना परिसरातील जवळपास १०० तरुणांनी या कार्यात सहभाग घेतला, व उत्साहपूर्वक वातावरणात संपूर्ण परिसर स्वछ केला. तरुणांचा उत्साह पाहता, परिसराच्या स्वच्छतेची व्यवस्था केल्यानंतर याठिकाणी काही मैदानी खेळ देखील खेळण्यात आले. काही कार्यक्रम घेण्यात आले, शेवटी वन भोजनाचा आस्वाद घेऊन सर्वजण आपापल्या घरी परतले. स्वच्छतेचा हा उपक्रम या परिसरात आजही सुरु आहे.

वात्सल्य सामाजिक संस्थेकडून असे अनेक छोटे मोठे उपक्रम राबवले जातात. सर्व समाज एकत्र यावा, संघटित व्हावा हा यामागील उद्देश असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *