नियम व अटी

ही वेबसाईट ‘वात्सल्य’ सामाजिक संस्थेकडून चालवली जाते. संपूर्ण वेबसाईटवरील “आम्ही” आणि “आम्हाला” हे शब्द ‘वात्सल्य सामाजिक संस्था’ या अर्थाने वापरण्यात आलेले आहेत. या वेबसाईटवरील सर्व माहिती आणि सेवा, सर्व नियम व अटी तसेच सर्व सूचना या वात्सल्य सामाजिक संस्थेच्या अखत्यारीतील विषय आहेत. जे याठिकाणी नमूद केलेले आहे.

आमच्या वेबसाईटला भेट देऊन, आपण काही सेवा प्रदान केल्या किंवा देणगी दिली असता, आपल्याला खालील नियम व अटी बंधनकारक आहेत, असे गृहित धरण्यात येईल.

त्यामुळे वेबसाईटवरील इतर माहिती वाचण्यापूर्वी या नियम व अटी समजून घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर वेबसाईटवरील सेवांशी आपण सहमत असाल तरच आपल्याला पुढे जाता येईल, अन्यथा वेबसाईटवरील महत्त्वाचा मजकूर वाचता येणार नाही.

या वेबसाईटवरील नव्याने भरण्यात येणारा प्रत्येक विषय अथवा मजकूर हा नियम व अटी अंतर्गत येतो. त्यामुळे या वेबसाईटच्या संकलनाचे संपूर्ण अधिकार आमच्याकडे राखीव आहेत.

महत्त्वपूर्ण नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत.

१.      सामान्य अटी

 •  वेबसाईटवरील सेवांचे सर्व अधिकार आमच्याकडे राखीव आहेत.
 •  क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही ट्रान्सफर करत असलेल्या रकमेचा तपशील अत्यंत गोपनीय असेल.
 • वेबसाईटवर असलेल्या अर्थपूर्ण माहितीचा, सेवांचा तपशील आमच्या लिखित परवानगीशिवाय इतरत्र वापरता येणार नाही.

२.     वेबसाईटवरील माहितीची सत्यता आणि शहानिशा

 • वेबसाईटवरील आमच्याकडून देण्यात आलेल्या सर्व माहितीशी आम्ही सहमत असू, असे नाही. कारण या साईटवरील माहिती ही केवळ संस्थेच्या कार्यक्षेत्राची माहिती आहे. संस्थेशी निगडीत असलेल्या इतर विषयांची आपण चौकशी करूनच पुढील निर्णय घ्यावेत.
 • आमच्या वेबसाईटवरील सर्व मजकूर बदलण्याचे, तो मजकूर तपासण्याचे सर्व अधिकार आमच्याकडे राखीव आहेत.

३.      बिलिंग आणि देयकाची शहानिशा

 •  वात्सल्य सामाजिक संस्थेस आपल्याकडून देण्यात येणाऱ्या देणगी संदर्भात, आपण क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून देणगी दिली असता, त्यामध्ये काही अडचणी निर्माण होत असतील, तर आपण आम्हाला कळवावे, तसेच तुम्ही देणगी दिल्यानंतर आमच्या बाजूने ऑनलाईन व्यवहारात काही अडचण निर्माण झालेली असेल, तर आम्ही आपल्याला ई-मेलच्या माध्यमातून कळवू.
 • त्यासाठी देणगी देत असताना तुम्ही तुमची संपूर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे. यामध्ये तुमचा ई-मेल आयडी, क्रेडिट कार्ड नंबर आणि त्याची संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे.

४.     इतर माहिती

 • आम्ही आपल्याला एक थर्ड पार्टी टूल देऊ, जे आम्ही चालवत नसू. परंतु ते संपूर्ण सुरक्षित असेल.
 • परंतु या टूल्सचा वापर करत असताना तो सर्वस्वी तुमचा स्वतःचा अधिकार आणि निर्णय असणार आहे.
 • भविष्यात या वेबसाईटच्या माध्यमातून सुरु करण्यात येणारे असे सर्व टूल्स वरील नियम व अटीच्या अखत्यारीत असतील.

५.    थर्ड पार्टी लिंक संदर्भात

 • या वेबसाईटवर देण्यात आलेल्या थर्ड पार्टी युजरकडून देण्यात आलेल्या लिंकच्या संदर्भात आम्ही जबाबदर नाहीत.
 • यामध्ये इतर थर्ड पार्टी युजर वेबसाईटवर करण्यात आलेल्या कोणत्याही गोष्टीशी आमचा दुरान्वये संबंध नसेल.

६.    आपल्या प्रतिक्रिया संदर्भात

 • आपण आम्हाला पाठवलेल्या कोणत्याही प्रतिक्रियेसंदर्भात बोलत असताना नियम १, २ आणि ३ मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व अधिकार आमच्याकडे राखीव असतील.
 • आमच्या नियम व अटीच्या बाहेरील मजकूर अथवा प्रतिक्रिया मान्य करणे अथवा त्या स्वीकारणे आमच्यावर बंधनकारक नाही.
 • तसेच तुम्ही देत असलेल्या प्रतिक्रिया देखील कोणाचे अधिकार हनन करणार नाहीत, याची आपण काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आपण चुकीची माहिती देणे, चुकीचा ई-मेल आयडी देणे हे देखील अपेक्षित नाही. त्यामुळे तुम्ही देत असलेल्या कोणत्याही माहितीशी अथवा प्रतिक्रीयेसंदर्भात सर्वस्वी तुम्ही स्वतः जबाबदार असाल, हे आम्ही सूचित करत आहोत.

७.    वैयक्तिक माहिती

 • तुम्ही सादर केलेली वैयक्तिक माहिती संपूर्णपणे आमच्या नियम व अटीशी बांधील असेल.

८.     वेबसाईटवरील माहितीचा अचूकपणा

 • आपण दिलेल्या देणगी संदर्भात वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीमध्ये टायपिंगच्या काही चुका तर त्याबाबत सुचवण्यात आलेले बदल करण्यात येतील.
 • वेबसाईटवर देण्यात येणारी माहिती तसेच देणगी देणाऱ्या मान्यवर मंडळी संदर्भातील माहिती अचूकपणे देण्यात यावी, याबाबत आमचा कटाक्ष असेल. त्यावेळी वेबसाईटवर अनिवार्य असलेले बदल करण्यसाठी आम्ही तयार आहोत.

९.     प्रतिबंधात्मकता   

 • आमच्या परवानगीशिवाय वेबसाईटवरील महत्त्वपूर्ण माहिती इतरत्र वापरण्यास सक्त मनाई आहे.
 • आमच्या साईटवरील माहिती,
 1.  बेकायदेशीरपणे वापरणे
 2. दुसऱ्यांना वापरण्यास देणे
 3. एखादा अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय कायदा मोडणे
 4. जात, लिंग या धर्तीवर कोणालाही त्रास देणे
 5. अथवा इतर बाबी

या बाबत सक्त ताकीत म्हणून प्रतिबंध करण्यात आलेला आहे. आमच्या परवानगीशिवाय आपण काहीही करू शकत नाहीत.  

१०.  अस्वीकरण

 • आमचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार, इंटर्न, पुरवठा करणारे, सेवा प्रदाता किंवा परवानाधारक कोणत्याही कारणासाठी जबाबदार नसतील.

११.  संकेत

१२. सुरक्षितता

१३. करार रद्द करणे

 • या वेबसाईटवरील सेवा व अटी आपण किंवा आमच्या दोघांद्वारे माहिती देऊन संपुष्टात आणल्याशिवाय प्रभावी होणार नाहीत. आपण यापुढे आमच्या सेवा वापरू इच्छित नाही किंवा आपण आमची साइट वापरणे थांबविता, तेव्हा आम्हाला सूचित करुन आपण या सेवेच्या अटी कोणत्याही वेळी संपुष्टात आणू शकता.

१४. संपूर्ण करार माहिती

१५.शासकीय कायदे

 •   या वेबसाईटवरील आम्ही पुरवत असलेल्या सेवेच्या अटी आणि कोणत्याही स्वतंत्र कराराच्या अटी या कायद्याच्या कार्यकक्षेच्या अधीन असतील.

१६. सेवांच्या नियम व अटीमधील बदल

 • आपण या वेबसाईटवरील सेवा अटींच्या सर्वात नवीन आवृत्तीचे कधीही पुनरावलोकन करू शकता.

१७. संपर्क

 • आपल्याला वरील नियम व अटी संदर्भात काही प्रश्न असतील तर vatslyango@gmail.com या मेल वर पाठवावेत.