आमची मुल्ये

वात्सल्य सामाजिक संस्थेच्या ध्येयांची अष्टसूत्री

१. महाराष्ट्रातील गरजू व वंचित घटकातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून, त्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहणे.

२. समाजातील दरी दूर करून, वंचित घटकांना इतर समाजाच्या बरोबरीने उभं राहण्याची हिम्मत मिळवून देणे.

३. समाजातील वंचित घटकाच्या कल्याणासाठी माध्यम म्हणून काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करणे

४. समाजातील वंचित घटकाच्या उद्धाराचा वसा घेतलेल्या प्रत्येकासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे.

५. सामाजिक बांधिलकी जपताना वंचित समाजाला शिक्षण देऊन, औद्योगिकदृष्ट्या प्रशिक्षित करून सक्षम बनवणे.

६. दुष्काळ निवारण करण्यासाठी गावोगावी शाश्वत उपाययोजना करणे.

७. चारा छावणी तसेच गो रक्षण या माध्यमातून गोवंश संवर्धन करणे.

८. ‘स्वच्छतेचा महायज्ञ’ यासारखे स्वच्छता विषयक कार्यक्रम राबवून समाज जागृत करणे.कर्तव्य

सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्य करत असताना ठराविक ध्येय गाठण्यासाठी काही कर्तव्य देखील पार पाडावी लागतात. यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असताना, सर्वांमध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हे वात्सल्य सामाजिक संस्थेचे मुख्य कर्तव्य आहे.

‘वात्सल्य’ सामाजिक संस्थेच्या कर्तव्यांचे अष्टांग

१. समाजातील वंचित घटकातील व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे.

२. समाजातील वंचितांना इतरांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्यासाठी आंतरिक बळ देणे.

३. समाजातील वंचित घटकाच्या कल्याणासाठी अधिकाधिक वेळ देताना, सर्वांना सोबत घेऊन काम करत राहणे

४. समाजातील वंचितांच्या उध्दाराचा वसा घेतलेल्या आणि वात्सल्य सामाजिक संस्थेकडे या उद्धाराचे माध्यम म्हणून पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि वात्सल्य संस्थेमध्ये पारदर्शकता ठेवणे

५. वंचित घटकांना सर्वच क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी केवळ आणि केवळ एक माध्यम म्हणून कार्य करत राहणे

६. दुष्काळ निवारण करण्यासाठी शाश्वत आणि पूर्णकालीन उपाययोजना आमलात आणणे, हे आमचे ध्येय आहे, या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे

७. गो वंश संवर्धन तसेच संरक्षण करत असताना भारतीय संस्कृतीचे जतन करणे

८. समाज जागृतीसाठी सामाजिक अभिसरणाचे विविध प्रयोग करणे आणि यामधून समाज एकसंध करणे.