वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून “ताईसाठी एक साडी” उपक्रम…

वात्सल्य सामाजिक संस्था,सामाजिक क्षेत्रातील अनेक विषयात काम करते,यात जलसंधारण,गोशाळा,अनाथ मुलांना शैक्षणिक मदत, वृक्ष लागवड व संगोपन,एकल महिला यांचा समावेश आहे समाजातील अनेक सूह्रदयी व्यक्तींच्या मदतीने वात्सल्यने एकल महिलांमध्ये अधिक जोमाने व शाश्वत स्वरूपाचे काम करण्याचा निर्धार केला आहे. एकल महिला श्रेणीतील भगीनींचे प्रश्नच जगावेगळे आहेत,जगण्यासाठी सहन कराव्या लागणाऱ्या मरणयातना,मुलाबाळांसह महिलेची होणारी वाताहत,तारुण्यअवस्थेतील एकल महिलांकडे बघण्याचा काही व्यक्तींचा विकृत दृष्टिकोण,जगण्यातील हरवलेला …