श्री शिवकुमार स्वामी, उस्मानाबाद उपजिल्हाधिकारी यांची संस्थेला सदिच्छा भेट

अणदूरच्या जवाहर विद्यालयातील मराठीचे विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री.प्रकाश बऱ्हाणपूरकर यांच्या पत्नी व प्रिसिजन उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी श्री.माधव दादा देशपांडे यांच्या भगिनी ज्योती प्रकाश बऱ्हाणपूरकर यांचे मागच्या वर्षी दुःखद निधन झाले. अनेक विद्यार्थ्यांच्या त्या लाडक्या ज्योती काकू होत्या साहजीकच घरी सातत्याने मुलांचा राबता असायचा,काकूंनी गरजवंत महिलांमध्ये रमणे,गप्पा मारणे,अडचणीच्या प्रसंगी मदत करणे हा शिरस्ता आयुष्यभर ठेवला. त्यांच्या दुःखद निधनानंतर त्यांचा तोच वारसा …
मी-हां आशा बोल,मी मजेत आहे.तू कशी आहेस? तुझी बच्चू (आशाची लाडकी लेक हिंदवी) काय म्हणते?जय हिंद सर (आशाचे पती भारतीय सैन्य दलात आहेत,सध्या त्यांची पोस्टिंग गोव्याला आहे,मी प्रेमाने त्यांना जय हिंद सर म्हणतो) कुठे आहेत? मी प्रश्नांचा भडिमार करत होतो. आशा-आम्ही सर्वजण मजेत आहोत.सर ना,माझ्या हिंदवी चा पहिला वाढदिवस आहे आणि मला वात्सल्यच्या तयार होणाऱ्या गोशाळेसाठी दोन हजार पेंडया कडबा …
वात्सल्य सामाजिक संस्था,सामाजिक क्षेत्रातील अनेक विषयात काम करते,यात जलसंधारण,गोशाळा,अनाथ मुलांना शैक्षणिक मदत, वृक्ष लागवड व संगोपन,एकल महिला यांचा समावेश आहे समाजातील अनेक सूह्रदयी व्यक्तींच्या मदतीने वात्सल्यने एकल महिलांमध्ये अधिक जोमाने व शाश्वत स्वरूपाचे काम करण्याचा निर्धार केला आहे. एकल महिला श्रेणीतील भगीनींचे प्रश्नच जगावेगळे आहेत,जगण्यासाठी सहन कराव्या लागणाऱ्या मरणयातना,मुलाबाळांसह महिलेची होणारी वाताहत,तारुण्यअवस्थेतील एकल महिलांकडे बघण्याचा काही व्यक्तींचा विकृत दृष्टिकोण,जगण्यातील हरवलेला …
काही दिवसांपूर्वी डिव्हाईन जस्टीस या माझ्या पुस्तकाचे नायक श्री. उमाकांत मिटकर यांचा डुकराचे मटन खावे लागण्याचा प्रसंग शेअर केला हाेता. या प्रसंगासह त्यांच्या जीवनप्रेरणा त्यांच्याच शब्दात ऐका… आज दत्ता जाेशी इनिशिएटिव्हमध्ये…
नळदुर्ग येथील वात्सल्य सामाजिक संस्था व आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने नळदुर्ग व तुळजापूर परिसरातील गरजवंत कुटुंबाचा सर्वे करून व स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन मदत केली जात आहे काय म्हणतात उमाकांत मिटकर पहा