आईच्या स्मृतिदिनी एकल महिलांना मदत…

अणदूरच्या जवाहर विद्यालयातील मराठीचे विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री.प्रकाश बऱ्हाणपूरकर यांच्या पत्नी व प्रिसिजन उद्योग समूहाचे जनसंपर्क अधिकारी श्री.माधव दादा देशपांडे यांच्या भगिनी ज्योती प्रकाश बऱ्हाणपूरकर यांचे मागच्या वर्षी दुःखद निधन झाले.

अनेक विद्यार्थ्यांच्या त्या लाडक्या ज्योती काकू होत्या साहजीकच घरी सातत्याने मुलांचा राबता असायचा,काकूंनी गरजवंत महिलांमध्ये रमणे,गप्पा मारणे,अडचणीच्या प्रसंगी मदत करणे हा शिरस्ता आयुष्यभर ठेवला. त्यांच्या दुःखद निधनानंतर त्यांचा तोच वारसा त्यांची दोन्ही मुले पराग व प्रीतम चालवत आहेत.

आपल्या प्रिय आईच्या प्रथम स्मृतिदिनी बऱ्हाणपूरकर कुटुंबियांनी वात्सल्य परीवारातील एकल भगीनींना साडी व मिठाई ची भेट दिली.

संस्थेत वृक्षारोपण केले आणि अशा संस्थांच्या पाठीशी नेहमीच उभे राहू विश्वास दिला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *